स्फुट
वैयक्तिक आयुष्यात देवावर, नियतीवर श्रद्धा असण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही. पण सार्वजनिक, सामाजिक जीवनात तिची लुडबूड होते तेव्हा चिंता वाटते, वाढते. संघटित धर्मसंस्था सत्तापिपासू लोकांना हमखास आपल्याकडे खेचून घेते आणि मग त्यात राजकारणातील अनिष्ट गोष्टी शिरतात. पाश्चिमात्य राष्ट्रात चर्चचा इतिहास पाहा. आपल्याकडील रथयात्रेपासून सुरुवात झालेल्या घटना पाहून हेच दिसते की जास्त संख्येने लोक आकृष्ट होतात …